🚨 विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट 1पथकाने केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

🚨 विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट 1पथकाने केली अटक💁‍♂ विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने छापा मारून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डेक्कन बस स्टॉपसमोरील डेक्कन ढाबा हॉटेलसमोरील फुटपाथवर रविवारी (दि.17) केली. अमोल विलास खरात (वय-28 रा. मुपो दहीवडी, आंबेडकर नगर, ता. मान, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

👉 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस कर्माचारी गजानन सोनुने हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना डेक्कन ढाबा समोरील फुटपाथवर एका तरुणाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छापा टाकून अमोल खरात याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कंबरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि पिशवीमध्ये 4 जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडून 40 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🚨 सदरची कारवाई,
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, हनुमंत शिंदे, पोलीस शिपाई गजानन सोनुने, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, सहायक पोलीस फौजदार वसावे, पोलीस हवालदार अशोक माने, प्रकाश लोखंडे, पोलीस नाईक इम्रान शेख, सुधाकर माने यांच्या पथकाने केली.

Post Bottom Ad

#

Pages