🚨 एक विदेशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकाला कोंढवा पोलिसांनी केली अटक; 11 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 20, 2019

🚨 एक विदेशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकाला कोंढवा पोलिसांनी केली अटक; 11 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्तभूषण गरुड :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अश्रफ जावेद शेख (रा.भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पुणे) नामक 24 वर्षीय युवकाला एक विदेशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, असा एकूण 11 हजार 100 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. 

👉 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवार दिनांक 19  नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी पोलीस शिपाई पवार हे गस्तीवर असताना कोंढवा खुर्द परिसरातील भाग्योदयनगर भागात एक संशयित व्यक्ती फिरत असून त्याच्याकडे पिस्टल असल्याबाबत खबर मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांच्यासह, सहाय्यक पोलीस फौजदार ईकबाल शेख, पोलीस नाईक योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, पोलीस शिपाई अझीम शेख, किशोर वळे, उमाकांत स्वामी तपास पथकातील पोलिसांनी भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द येथे सापळा रचून आश्रफला ताब्यात घेत त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक विदेशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, असा एकूण 11 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पोलीस शिपाई पवार यांच्या फिर्यादीनुसार कलम 3(25), 37(1) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अश्रफ जावेद शेख कडे आढळलेला पिस्टल त्याने काशासाठी आणला, कुठून उपलब्ध केला, त्याचा कुठल्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का याचा खुलासा होण्यासाठी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

🚨 सदरची कामगिरी, 
मा. श्री. सुनील फुलारी सो अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा.श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.सुनील कलगुटकर सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा.श्री. मुरलीधर करपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे, श्री. महादेव कुंभार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार ईकबाल शेख, पोलीस नाईक योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, पोलीस शिपाई अझीम शेख, किशोर वळे, उमाकांत स्वामी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages