🚨 गांजा विकणा-याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक; 13 हजार 400 रुपये किमतीचा ५७५ ग्रॅम गांजा जप्त - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🚨 गांजा विकणा-याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक; 13 हजार 400 रुपये किमतीचा ५७५ ग्रॅम गांजा जप्त 💁‍♂ गांजा विकणा-या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 13 हजार 400 रुपये किमतीचा ५७५ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 17) दुपारी पावणेतीनच्या सुमारास पूर्णानगर येथे करण्यात आली.


👉 तीर्थराज बबनराव केसभट (वय 41, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजन महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एक व्यक्ती पूर्णानगर येथील हॉटेल मौर्य जवळ संशयितरित्या फिरत असल्याचे माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, परिसरात सापळा रचून पोलिसांनी तीर्थराज याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 575 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याच्याकडून गांजा आणि रोख रक्कम असा एकूण 13 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages