🔯 आजचे राशी भविष्य 19 नोव्हेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, November 19, 2019

🔯 आजचे राशी भविष्य 19 नोव्हेंबर 2019🌞 दिन विशेष
▪ इसवी सन १९ नोव्हेंबर २०१९
▪ शालिवाहन शक १९४१
▪ विक्रम संवत २०७६
▪ युगाब्द  ५१२१ 
▪ संवत्सर नाम: विकारी
▪ अयन : दक्षिणायण 
▪ ऋतु : शरद
▪ मास: कार्तिक
▪ पक्ष : कृष्ण 
▪ तिथी : सप्तमी (१५.३६) ~ अष्टमी   
▪ वार : मंगळवार 
▪ नक्षत्र : आश्लेषा   
▪ राशी :  कर्क 

🔹 जागतिक शौचालय दिन 
🔹 आंतरराष्ट्रीय पुरूष दिन
🔹 महिला उद्योजकता दिन

1⃣ राष्ट्रीय शक 1882 (ख्रिश्चन१९६०): महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.
2⃣ राष्ट्रीय शक 1891 (ख्रिश्चन १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.
3⃣ राष्ट्रीय शक 1891 ख्रिश्चन १९६९): अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
4⃣ राष्ट्रीय शक 1920 (ख्रिश्चन १९९८): व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
5⃣ राष्ट्रीय शक 1920 (ख्रिश्चन १९९८): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

💁‍♂ जन्मदिवस:-

1⃣ राष्ट्रीय शक 1750 (ख्रिश्चन १८२८): झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई 
2⃣ राष्ट्रीय शक 1760 (ख्रिश्चन १८३८): ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन 
3⃣ राष्ट्रीय शक 1797 (ख्रिश्चन १८७५): प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर 
4⃣ राष्ट्रीय शक 1831 (ख्रिश्चन १९०९): ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर 
5⃣ राष्ट्रीय शक 1836 (ख्रिश्चन १९१४): क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे 
6⃣ राष्ट्रीय शक 1839 (ख्रिश्चन १९१७): भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी 
7⃣ राष्ट्रीय शक 1844 (ख्रिश्चन १९२२): हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी 
8⃣ राष्ट्रीय शक 1850 (ख्रिश्चन १९२८): मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग 
9⃣ राष्ट्रीय शक 1873 (ख्रिश्चन १९५१): अभिनेत्री झीनत अमन 
🔟 राष्ट्रीय शक 1897 (ख्रिश्चन १९७५): मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन 

💁‍♂ मृत्यूदिन:-
१८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स 

1⃣ राष्ट्रीय शक 1893 (ख्रिश्चन १९७१): मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये 
2⃣ राष्ट्रीय शक 1805 (ख्रिश्चन १८८३): जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स 
3⃣ राष्ट्रीय शक 1893 (ख्रिश्चन १९७१): मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये 

🕉 ।। दास-वाणी ।।

येके कल्पनेचे पोटीं । 
होति जाती अनंत सृष्टी । 
तया सृष्टीची गोष्टी । 
साच केवी  ।। 

कल्पनेचा केला देव । 
तेथे जाला दृढभाव । 
देवालागीं येतां खेव । 
भक्त दु:खें दु:खवला  ।। 

🔯 आजचे राशी भविष्य 19 नोव्हेंबर 2019

मेष : क्षुल्लक कारणाने एखादे काम रेंगाळ्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. आपसांत गैरसमज होईल.

वृषभ : अडचणी कमी झाल्याने सरकार दरबारची कामे करता येतील. नोकर माणसे त्रास करण्याची शक्यता आहे.

मिथुन : अपेक्षित व्यक्तीची मदत मिळणे थोडे कठीण होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. जुने स्नेही भेटतील.

कर्क : मुलांची प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांना तुमची मदत महत्त्वाची ठरेल. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा.

सिंह : अपमानास्पद घटना घडण्याची शक्यता आहे. अचानक कामात बदल करण्याची वेळ येईल.

कन्या : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. नवीन परिचय फायदेशीर व उत्साहवर्धक ठरेल. धंदा वाढेल.

तूळ : राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. थकबाकी वसूल करा.

वृश्चिक : तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या बरोबर झालेला वाद मिटेल. प्रवासात घाई करू नका. नम्र रहा.

धनु : घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. स्वतःचे काम वाढेल. कामात बदल होऊ शकतो.

मकर : आज महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मान-सन्मान मिळेल. स्पर्धा जिंकाल. धंदा वाढेल. मित्र भेटतील.

कुंभ : अचानक कुणी आल्याने तुमचा वेळ फुकट खर्च होईल. शेजारी एखादी तक्रार करेल. पोटदुखी होऊ शकते.

मीन : आज ठरविलेले काम आजच पूर्ण करा. उद्या अडचण येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांना खुष करता येईल.

Post Bottom Ad

#

Pages