🔯 साप्ताहिक राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2019 ते 29 नोव्हेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 23, 2019

🔯 साप्ताहिक राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2019 ते 29 नोव्हेंबर 2019



🔯 राशिभविष्य 

🔹 मेष
▪ कामे मार्गी
सध्या थंडी आणि ऊन या दोहोंचा अनुभव येतो आहे. या हवेचा विपरीत परिणाम प्रकृतीवर होऊ देऊ नका. नव्या कपडयांची खरेदी कराल. पांढरा रंग परिधान करा. बराच काळ अडकलेले काम यशस्वीपणे पुढे न्याल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल.
शुभ परिधान – पांढरा शर्ट, कमरपट्टा

🔹 वृषभ
▪ नवा व्यावसाय
कामामुळे बाहेरगावी प्रवास करावा लागेल. शक्यतो त्यामुळे पायावर ताण येण्याची शक्यता आहे. खूप वेळ उभे राहणे टाळावे. भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल ग्रहमान. जांभळा रंग अवश्य जवळ ठेवावा.
शुभ परिधान – ब्रेसलेट, रुद्राक्ष

🔹 मिथुन
▪ नात्यात गोडवा
जवळच्या नात्यात उगाचच गैरसमज निर्माण होतील. नात्यांवरील मळभ आपसूकच दूर होईल. त्यामुळे मानसिक तणावापासून दूर राहा. लाल रंग जवळ ठेवा. कामाच्या ठिकाणी नेटके काम कराल. शक्य असल्यास गायीला चारा घाला.
शुभ परिधान – शालू, गोफ

🔹 कर्क
▪ सहलीला चला
आपल्या कामाच्या बाबतीत संतुष्ट राहाल. त्याचे सकारात्मक परिणाम घरात होतील. आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबीयांसोबत छोटीशी सहल आयोजित कराल. कृषी पर्यटन करा. मोतिया रंग जवळ बाळगा. नवी उर्जा मिळेल.
शुभ परिधान – मोत्याची माळ, सुगंध

🔹 सिंह
▪ महत्त्वाच्या भेटीगाठी
अपचनाचे विकार संभवतील. घरातील सात्त्विक आहार घ्या. बाहेरील अनावश्यक खर्च टाळण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील. पण मनात अस्वस्थता दाटून येईल. रामरक्षा स्तोत्र म्हणा. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – आवडीचे कपडे

🔹 कन्या
▪ मेहनतीचे फळ
अनेक दिवस करीत असलेल्या मेहनतीचे फळ या आठवडय़ात मिळणार आहे. हवेमुळे श्वसनाचे विकार उद्भवतील. संध्याकाळनंतर बाहेर राहणे टाळा. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याचा योग येईल. हिरवा रंग लाभदायी. घरात विवाहाची बोलणी होतील.
शुभ परिधान – पाचूची अंगठी, कोटा साडी

🔹 तूळ
▪ नवे साहित्य
संपूर्ण आठवडा उत्साहवर्धक राहील. घसघशीत अर्थप्राप्ती होईल. पैसे उधळू नका. रात्रीचे जागरण टाळा. घरातील वादविवादांना आळा घाला. निळा रंग जवळ ठेवा. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. नवे साहित्य वाचनात येईल.
शुभ परिधान – लांब कुर्ता, मंगळसूत्र

🔹 वृश्चिक
▪ गप्पा टप्पा
मनातील कटुता काढून टाका. जसे पाहाल तसे जग दिसेल. स्वतःला विधायक कार्यात गुंतवून घ्या. त्यातून पैसे आणि मानसिक समाधान दोन्ही लाभेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. भगवा रंग परिधान करा. मनोरंजन होईल. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल.
शुभ परिधान – आरामदायी कपडे, रंगीत दागिने

🔹 धनु
▪ स्पर्धेत यश
समाजातील प्रतिष्ठा वाढेल. मित्रमंडळींत लेकप्रिय व्हाल. आवडीचे काम करण्याचा मोका मिळेल. खेळाडूंसाठी हा आठवडा यशदायी ठरेल. स्नायूंचे दुखणे उद्भवते. स्पर्धेत यश मिळेल. आकाशी रंग जवळ बाळगा. नोकरी करणाऱया व्यक्तींसाठी चांगला आठवडा.
शुभ परिधान – टाय, घडय़ाळ

🔹 मकर
▪ मार्ग निघेल
हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास अडथळे येतील. त्यामुळे काळजी आणि चिंता मनास व्यापून राहील. पण तुमचा कामाचा धडाका आणि धडाडी यामुळे यातून मार्ग काढाल. हृदयाची काळजी घ्या. कामातील यश दिलासा देणारे ठरेल. राखाडी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुती कपडे, पैंजण

🔹 कुंभ
▪ नवी उर्जा
मनाप्रमाणे घडेल. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे नवा उत्साह जाणवेल. चालण्यात सातत्य ठेवा. तिळाच्या तेलाने पायांचे मर्दन करून घ्या. अबोली रंग जवळ बाळगा. देवघरात एकमुखी रुद्राक्षाची प्रतिस्थापना करा.
शुभ परिधान – काळा दोरा, चांदी

🔹 मीन
▪ मान मिळेल
शुभ वर्तमान कानी येईल. त्यामुळे नवी उमेद अजागी होईल. क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. मान मरातब मिळेल. मेहनत जीवतोड करावी लागेल. रात्रीची झोप पूर्ण घ्या. तब्येतीवर सकारात्मक परिणाम होईल. पांढरा रंग जवळ बाळगा. मारुतीची उपासना करा.
शुभ परिधान – खेळाचे कपडे, स्पोर्ट्स शूज

Post Bottom Ad

#

Pages