😱भेटवस्तू आयफोन देण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय एका तरुणाला 63 हजार 473 रुपयाला लुबाडले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, November 29, 2019

😱भेटवस्तू आयफोन देण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय एका तरुणाला 63 हजार 473 रुपयाला लुबाडले 💁‍♂भेटवस्तू स्वरुपात आयफोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका 24 वर्षीय तरुणाला विविध कारणे देत तब्बल 63 हजार 473 रुपयाला लुबाडले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉धानोरी येथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एका पेटीएमधारक महिलेने त्यांना मोबाइलवर कॉल करून ऍमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीकडून तुम्हाला प्रमोशनल ऍपल आय फोन गिफ्ट व्हाऊचर स्वरुपात मिळणार आहे, असे सांगितले. हे व्हाऊचर मिळवण्यासाठी कमीत कमी पाच हजार रुपयांची खरेदी ऍमेझॉनवरून करावी लागेल व ती वस्तू ऍमेझॉन ऍप्लिकेशनच्या कार्टमध्ये ऍड करावी लागेल, असे सांगत तसे करण्यास भाग पाडले. त्यानंतर गिफ्टसाठी जीएसटी भरावी लागेल अशी विविध कारणे देत तब्बल 63 हजार 473 रुपये भरावयास सांगितले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्याद देण्यात आली.
सदर घटनेचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages