🔯 राशि भविष्य शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2019 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 30, 2019

🔯 राशि भविष्य शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2019🔯 राशि फल

मेष - आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका.

वृषभ - कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित कराल.

▪ मिथुन - यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. संमिश्र परिणामांचा दिवस. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

कर्क - आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल.

सिंह - बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा.

कन्या - दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते पण नंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू शकतील.

तूळ - मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर लोकांना आपण प्रभावित कराल. आपल्या प्रिय व्यक्ती अधिक लक्ष मिळावे अशी अपेक्षा ठेवतात.

वृश्चिक - मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल.

▪ धनु - आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल.

मकर - महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल.

कुंभ - जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल.

▪ मीन - आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आपणास आपल्या सामर्थ्यावर विश्वास होईल.

Post Bottom Ad

#

Pages