🚨 शिवनेरी बस मधील प्रवाशांनचे लॅपटॉप चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद; 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 19 लॅपटॉप केले हस्तगत - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 20, 2019

🚨 शिवनेरी बस मधील प्रवाशांनचे लॅपटॉप चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद; 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 19 लॅपटॉप केले हस्तगत

👌🏻 पुणे शहरातील मुख्य स्थानक म्हणजे स्वारगेट एस टी स्टँड. याठिकाणी एसटीने प्रवास करणाऱ्यांची वर्दळ सतत चालूच असते. या वर्दळीचा फायदा घेत काही समाजकंटक हे प्रवाशांच्या वस्तूची चोरी करत असतात. या घटनांना वेळोवेळी लगाम लावण्यासाठी स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या आदेशानुसार सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली स्वारगेट पोलिसांची सतत गस्त चालू असते.

💁‍♂ पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड व पुणे स्टेशन एसटी स्टँड येथील शिवनेरी बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लॅपटॉपची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी केली अटक चोरलेल्या लॅपटॉपची विक्री करणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 19 लॅपटॉप हस्तगत केले.

💻 लॅपटॉपची चोरी करणारा सराईत गुन्हेगार दिलीप दशरथ डिकोळे (वय 30, रा. घोटी, ता.करमाला, सोलापूर) व चोरी केलेल्या लॅपटॉपची विक्री करणारा साथीदार समाधान भारत भोसले (वय 39, रा. नेरले, ता.करमाला, सोलापूर) यास स्वारगेट तपास पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. लॅपटॉपची चोरी करणारा सराईत गुन्हेगार दिलीप डिकोळे यांच्यावर ईतवार पोलीस ठाणे, मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन, करमाळा पोलीस ठाणेच्या अभिलेखावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

💁‍♂ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
स्वारगेट पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील दाखल गुन्ह्याचा तपास पथकातील अधिकारी सीसीटीव्ही माध्यमातून शोध घेत असताना. सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित व्यक्तीची स्वारगेट एसटी स्टँड येथील प्रवाशांना संशयित इसमाची चौकशी केली असता. दोन प्रवाशांनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित इसम हा दिलीप दशरथ डिकोळे (वय 30, रा. घोटी, तालुका करमाळा, सोलापूर) यांच्या सारखा दिसत असल्याची माहिती मिळताच. स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक जायभाय, आदलिंग तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी स्टँड येथील शिवनेरी बस मधील प्रवाशांचे लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले लॅपटॉप त्याचा साथीदार समाधान भारत भोसले (वय 39, रा. नेरले, तालुका करमाळा,सोलापूर) यास विकण्यासाठी देत असे. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 19 लॅपटॉप हस्तगत करत स्वारगेट पोलिसांनी लॅपटॉप चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करत आहेत.

👉 शिवनेरी बस मधून लॅपटॉप चोरी करण्याची चोराची पद्धत :-
पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड व पुणे स्टेशन एसटी स्टँड येथील शिवनेरी बस मध्ये लॅपटॉप असलेल्या प्रवाशी पाहून त्याच्यासोबत बसमध्ये चढून लॅपटॉप असणाऱ्या प्रवाशाच्या सीट जवळ उभा राहून प्रवाशाच्या बागेजवळ स्वतःची बॅग ठेवून शिवनेरी बस गाडी सुटण्याच्या वेळी लॅपटॉपची बॅग घेऊन स्वतःची बॅग त्याठिकाणी ठेवून गाडी सुटण्याच्या वेळी बस मधून उतरून लॅपटॉप चोरी करायचा तसेच चोरी केलेल्या लॅपटॉप विक्री करण्यासाठी साथीदाराला द्यायचा, असे दोन वर्षांमध्ये एकूण त्या दोघांनी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 19 लॅपटॉप चोरी केले होते.

🗣 स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांचे जनतेला आव्हान करण्यात येत आहे की, स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड व पुणे रेल्वेस्टेशन एसटी स्टँड याठिकाणी कोणाचे लॅपटॉप चोरीला गेले असतील त्यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.

🚨 सदरची कामगिरी,
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पुणे शहर शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, संजय आदलिंग, पोलीस हवालदार शेख, गबाले, कदम, कुंभार, कांबळे, पोलीस शिपाई दळवी, साळवे, बडे, सरक, भोकरे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages