😱 कात्रज घाटात शिवशाही बस 50 फुट खोलदरीत कोसळली; एका प्रवाशाचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 25, 2019

😱 कात्रज घाटात शिवशाही बस 50 फुट खोलदरीत कोसळली; एका प्रवाशाचा मृत्यू💁‍♂ चालकाचे नियंत्रण सुटून शिवशाही बस कात्रज घाटात शिंदेवाडी गावच्या हद्दीत सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एक जणाचा मृत्यु झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


🚨 राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शिवशाही बस स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही बस कात्रज बोगदा ओलांडून शिंदेवाडीच्या हद्दीत आली. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस येथील सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ही बस दरीत उलटली. त्यात अनेक प्रवासी अडकले होते. अपघात झाल्याबरोबर स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी ताबडतोब जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एक जणाचा मृत्यु झाला असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली. राजगड पोलिस, पुणे शहर पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages