😱 ट्रॅव्हल कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून बुकिंगचे पैसे परत देण्याच्या आमिषाने एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 27, 2019

😱 ट्रॅव्हल कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून बुकिंगचे पैसे परत देण्याच्या आमिषाने एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक

💫 खासगी ट्रॅव्हल कंपनीचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून बुकिंगचे पैसे परत देण्याच्या आमिषाने एका नागरिकाची 50 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

👉 या प्रकरणी, हडपसर येथे राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने एका खासगी ट्रॅव्हल कंपनीकडे गोव्यातील म्हापसा ते पुणे प्रवासासाठी जुन महिन्यात "मेक माय ट्रीप'कडे दोन तिकिटांचे बुकिंग केले होते. दरम्यान, काही कारणाने त्यांचे जाणे रद्द झाले. त्यामुळे त्यांनी बुकिंग केलेले पैसे परत मिळावेत, यासाठी "मेक माय ट्रीप'च्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी आपण कंपनीचे अधिकारी बोलत असल्याचे सांगून फिर्यादीला त्यांचे पैसे परत देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यांना त्यावर माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून त्यांची बॅंक खाती व डेबिट कार्डविषयीची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील 50 हजार रुपये काढून घेतले. 


Post Bottom Ad

#

Pages