🚨 बेकायदा दारू विक्री करणाऱ्या हॉटेल, ढाब्यावर पोलिसांची कारवाई; 52 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🚨 बेकायदा दारू विक्री करणाऱ्या हॉटेल, ढाब्यावर पोलिसांची कारवाई; 52 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त💁‍♂ जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या एका बेकायदा दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या पथकाने कारवाई केली. हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. बेकायदा दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गालगतच्या शिवराजे हॉटेलवर शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साडेसात वाजलेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या टीमने कारवाई केली. हॉटेल शिवराजेच्या मागील बाजूस बेकायदेशीर देशी-विदेशी दारूचा साठा होता. हा साठा एकूण 52 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔹 या प्रकरणी हॉटेल मालक नवनाथ पांडुरंग चोपडे (वय 29) व योगेश पांडुरंग चोपडे (वय 31, दोघे रा. नायगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तपास पोलीस उपनिरीक्षक मृग्दीप गायकवाड तपास करीत आहेत.

🔹 गेल्या अनेक वर्षांपासून मावळातील हॉटेल व धाब्यांवर खुलेआम बेकायदेशीरणे दारूची विक्री केली जात आहे; मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस यांच्याकडून त्यांच्यावर अद्यापपर्यंत ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने हॉटेल व ढाबे चालक निर्ढावले आहेत.

🔹 लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस नवनीत कावत यांची नियुक्‍ती झाल्यापासून नवनीत कवत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैद्य धंद्यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू केली आहे. तसेच हॉटेलवर बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल मालक व हॉटेलला बेकायदेशीररीत्या दारूचा पुरवठा करणाऱ्या दारू दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने अवैध दारू विक्रीची साखळी त्यांची बंद पडल्याने नवनीत कावत यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

🗣 हॉटेल ढाब्यांवर बेकायदेशीरपणे होणारी दारू विक्री रोखण्यासाठी फक्‍त हॉटेल, हॉटेल मालकांवर कारवाई करून चालणार नाही, तर ही बेकायदा दारू विक्रीची पूर्ण साखळी आहे. त्यामुळे आम्ही हॉटेल मालक, दारू दुकानदार, जागा मालक या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत – नवनीत कावत, उपविभागीय पोलीस अधिकारी. लोणावळा विभाग.

Post Bottom Ad

#

Pages