♊ कात्रज चौकात 6 पदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

♊ कात्रज चौकात 6 पदरी उड्डाण पूल उभारण्यात येणारभूषण गरुड :- कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी 6 पदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारतर्फे 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली .राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या वडगावच्या नवले पूल ते कात्रज पर्यंतच्या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचा कोनशिला समारंभ गडकरी यांच्या हस्ते पार पडला . नियोजित पुलाचे कामही त्वरित सुरु करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

👉 पुणे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून परिचित असलेल्या चांदणी चौकातील प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलासाठीचे भूसंपादन तातडीनं करावं असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी काल पुण्यात सांगितलं. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या.

💁‍♂ यापूर्वी गडकरी यांनी आंबेगाव परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी केली .शिवछत्रपतींचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोंचविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले तसंच आमदार भीमराव तापकीर यावेळी उपस्थित होते.

🗣 वाहतूक खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार करण्याची गरज आहे, असंही त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमांत सांगितलं.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर यांच्या ‘सानंद सकुशल’ आणि ‘माणूस नावाचे काम’ या पुस्तकांचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अरुण करमरकर, मिलिंद मराठे, गिरीष प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages