😱पोलिसांनी ही गाडी अडवून गाडीचालकाला 9 लाख 80 हजार रूपये इतका जबरी दंड ठोठावला - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 30, 2019

😱पोलिसांनी ही गाडी अडवून गाडीचालकाला 9 लाख 80 हजार रूपये इतका जबरी दंड ठोठावला💁‍♂देशामध्ये वाहतुकीचे नियक कडक करण्यात आले असून त्यानुसार अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी एका वाहनचालकाला इतका जबरदस्त दंड ठोठावला आहे की त्या दंडाच्या रकमेत एक गाडी विकत घेता येऊ शकेल. Hundai ची I10 गाडी विकत घेता येऊ शकते. परदेशातल्या रस्त्यांवरही तुरळक बघायला मिळणारी पोर्शची 911 ही गाडी अहमदाबादच्या रस्त्यावर फिरत होती. एवढी महागडी गाडी बघितल्यानंतर पोलीस ‘हा कोणीतरी मोठा माणूस असेल’ असं म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र अहमदाबाद पोलिसांनी ही गाडी अडवली आणि नंतर गाडीचालकाला जबरी दंड ठोठावला.

👉ही गाडी येत असताना पोलिसांनी बघितली आणि ती अडवली. पहिला प्रश्न गाडीचालकाला विचारला तो म्हणजे गाडीची नंबरप्लेट कुठे आहे? याचं उत्तर चालकाला देता आलं नाही. मग पोलिसांनी गाडीची कागदपत्र मागवली. ती देखील त्याच्याकडे नव्हती. मग पोलिसांनी शांतपणे कोमकोणत्या कायद्यांचे उल्लंघन केले आहे त्याची यादी केली आणि या उल्लंघनासाठी दंड किती होतो त्याची रक्कमही काढली. ही रक्कम 9 लाख 80 हजार इतकी झाली होती.

🚨पोलीस उपायुक्त तेजस पटेल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की हेल्मेट क्रॉसरोडवर चंदेरी रंगाची ही गाडी अडवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एम.बी.विरसा यांनी गाडीचे कागदपत्र, नंबरप्लेट यांची विचारणा केली. चालकाकडे यातलं काहीच नसल्याने विरसा यांनी नियमानुसार चालकाला दंड ठोठावला. ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. चालकाने दंडाची रक्कम RTO कडे भरायची आहे. रक्कम भरल्याची पावती दाखवल्यानंतरच गाडी सोडण्यात येणार आहे.

💸जप्त करण्यात आलेल्या गाडीची किंमत ही 2 कोटी रुपये इतकी असून ही गाडी 302 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठू शकते. गाडीच्या ताकदवान इंजिनामुळे 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग अवघ्या 4.3 सेकंदात गाठू शकते.

Post Bottom Ad

#

Pages