😱 शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर पुणे कृषी बाजार समितीचा कारवाईचा बडगा - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, November 22, 2019

😱 शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर पुणे कृषी बाजार समितीचा कारवाईचा बडगाभूषण गरुड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील चार आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात करत शेतकरी आणि खरेदीदार आणि बाजार समितीची १२ कोटी २२ लाख तेरा हजार ५३४ रुपयांची फसवणूक केल्याचे बाजार समितीच्या दप्तर तपासणीत निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावर दीडपट दंडासहित ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपये व्यापाऱ्यांकडून वसूल करून शेतकऱ्यांना त्यांची रक्कम व्याजासह परत करणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

👉 या प्रकरणानंतर बाजार समिती प्रशासनाने खासगी सीए नेमूण त्या चार आडत्यांसह इतर आडत्यांचे दफ्तर तपासणी हाती घेतली. तसेच ‘सीए’नी दिलेल्या अहवालाची तपासणी बाजार समितीकडून करण्यात आली. आत्तापर्यंत सुमारे ६० ते ७० आडत्यांची दफ्तरे तपासणीसाठी घेतली असून त्यापैकी प्रथम डाळिंबाच्या चार आडत्यांचा अहवाल आज प्रशासक देशमुख यांनी जाहीर केला आहे.

🗣 बाजार समितीने १/०४/१६ ते ३१/१२/१०१८ या दोन वर्षातील दप्तराची तपासणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून नियमापेक्षा जस्त्वकपत केलेली हमाली, तोलाई फरकाची रक्कम, खरेदीदारांकडून नियमापेक्षा जास्त वसूल लेव्ही फरक, बाजार समितीला कमी भरणा केलेली फी व देखरेख खर्च रक्कम आणि त्यावर दीडपट दंडाच्या कारवाईच्या नोटिसा व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. दंडासह रकमेचा भरणा करण्यास संबंधित आडत्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पंधरा दिवसांत त्यांनी अतिरिक्त केलेल्या वसुल रकमेबाबत काही पुरावे सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल. मात्र, कोणतेही कारण न दिल्यास पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर कायद्यानुसार मालमत्ता जप्तीची कार्यवाही केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.


१) व्यापाऱ्यांचे नाव – के. डी. चौधरी (गाळा क्र. ८९२)
◼ फरकाची रक्कम – ५ कोटी २८ लाख, ७३ हजार ४३०.
◼ दंडाची रक्कम – ७ कोटी ९३ लाख १० हजार १४५.
◼ एकूण वसुली रक्कम – १३ कोटी २१ लाख ८३ हजार ५७५.

२) व्यापाऱ्यांचे नाव – मे. सिद्धारूढ फ्रूट (गाळा क्र. ६६२)
◼ फरकाची रक्कम – ३ कोटी ४४ लाख, ३२ हजार ०८२.
◼ दंडाची रक्कम – ५ कोटी १६ लाख ४८ हजार १२३.
◼ एकूण वसुली रक्कम – ८ कोटी ६० लाख ८० हजार २०५.

३) व्यापाऱ्यांचे नाव – मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे (गाळा क्र. ३०२)
◼ फरकाची रक्कम – १ कोटी ९० लाख, ३२ हजार ८९०.
◼ दंडाची रक्कम – २ कोटी ८५ लाख ७१ हजार ८३५.
◼ एकूण वसुली रक्कम – ४ कोटी ७६ लाख १९ हजार ७२५.

४) व्यापाऱ्यांचे नाव – मे. भास्कर नागनाथ लवटे (गाळा क्र. ८८३)
◼ फरकाची रक्कम – १ कोटी ५८ लाख, ६० हजार १३२.
◼ दंडाची रक्कम – २ कोटी ३७ लाख ९९ हजार १९८.
◼ एकूण वसुली रक्कम – ३ कोटी ९६ लाख ५० हजार ३३०.

Post Bottom Ad

#

Pages