🚨 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 21, 2019

🚨 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या💁‍♂ पुणे शहरात कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास पथकातील पोलिस तपास करत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी आरोपीस सापळा रचून अटक करत पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.

👉 घरफोडी करणारा आरोपी फिरोज अल्ताफ शेख (वय 32, रा.येवलेवाडी,पुणे) यास कोंढवा पोलिसांनी अटक करत सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुन रोख रक्कमे पैकी 14,600/ - रोख रक्कम व गुन्हा करताना वापरलेले हत्यार (कटावणी) हस्तगत केले आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एकुन 62 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत

👉 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस ठाणे अभिलेखा वरील गु.र.क्र.८६८/१९ भा.द.वि.454,457,380 गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हयातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत फुटेज मधील आरोपीचा शोध घेत असताना कोंढवा तपास पथकाचे पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे व पोलीस शिपाई अझीम शेख यांना त्यांच्या खास बातमीदार कडून मिळाली माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार  यांना कळवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार ईकबाल शेख, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे,वनवे, पोलीस शिपाई अझीम शेख, उमाकांत स्वामी तपासणी पथकातील पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आरोपी फिरोज अल्ताफ शेख (वय 32, रा.येवलेवाडी,पुणे) यास सापळा रचून ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता आरोपीने कोंढवा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर
1⃣ गु.र.क्र.339/19 भा.द.वि.454, 380, 511.
2⃣ गु.र.क्र.785/19 भा.द.वि.कलम - 54, 380.
👆 अशा गुन्ह्यांची कबुली देत गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुन रोख रक्कमे पैकी 14,600/ - रोख रक्कम व गुन्हा करताना वापरलेले हत्यार (कटावणी) हस्तगत करत पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
आरोपी फिरोज अल्ताफ शेख हा सराईत गुन्हेगार असून  त्याच्यावर पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एकुन 62 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

🚨 सदरची कामगिरी,
अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रदेशीक विभाग सूनिल फुलारी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस वानवडी विभाग सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शना नुसार व सूचनेप्रमाणे कोंढवा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार इकबाल शेख, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे, वनवे, पोलीस शिपाई उमाकांत स्वामी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages