😱स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात भरधाव पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 28, 2019

😱स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात भरधाव पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


💁‍♂भरधाव पीएमपीएल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ते मार्केटयार्ड येथे भाजीखरेदीसाठी येत होते. त्यावेळीच हि दुर्दैवी घटना घडली. स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकातील ब्रीजखाली ही घटना घडली.

👉खुशाल अर्जुन मापारी (55, रा. आकाशनगर, वारजे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा दयानंद मापारी (23, रा. आकाशनगर, मापारी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🚨मिळालेल्या माहितीनुसार,
गुरूवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास अर्जुन मापारी त्यांच्या मोपेडवरून मार्केटयार्ड येथे भाजी आणण्यासाठी निघाले होते. लक्ष्मीनारायण चौकात आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या पीएमपीएल चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेचा पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages