शिवसेनेने मुंबईत मुक्कामी असलेल्या आमदारांना घरी जाण्याची दिली परवानगी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, November 15, 2019

शिवसेनेने मुंबईत मुक्कामी असलेल्या आमदारांना घरी जाण्याची दिली परवानगीसत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होईल म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेलवर ठेवले होते. जेणेकरुन अन्य पक्षाला त्यांचा संपर्क होणार नाही.  आज शिवसेनेने मुंबईत मुक्कामी  असलेल्या आमदारांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा राजकीय पेच आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेल रिट्रीटमधील मुक्काम हलविण्यात येणार होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हॉटेल रिट्रीटमधून आज रात्रीच हे आमदार गावाकडे निघणार आहेत. शिवसेना आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी शासनदरबारी मदत करण्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर घोडेबाजार होऊ नये म्हणून शिवसेनेने त्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या 63 आमदारांना मालाड येथील हॉटेल द रिट्रीटमध्ये ठेवले होते.

Post Bottom Ad

#

Pages