😱 ब्रेकिंग: दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे वंशज ठार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, November 19, 2019

😱 ब्रेकिंग: दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे वंशज ठार✍🏻 भूषण गरुड :- दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, जखमींवर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज सकाळी ९:०० वा. सुमारास ही घटना घडली.


👉 सोपान महाराज नामदास (वय ३६) आणि अतुल महाराज आळशी (वय २४) अशी मृत्यू झालेल्या वारकऱयांची नावे आहेत. यातील सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज आहेत.🔴 दुर्घटनेतील जखमीची नावे
१ . विष्णू सोपान हळवाल.
२ . शुभम नंदकिशोर आवरे
३ . दीपक अशोक लासुरे
४ . गजानन संतोष मानकर
५ . वैभव लक्ष्मण बराटे
६ . अभय अमृत मोकम्फले
७ . किर्तीमन प्रकाश गिरजे
८ . आकाश माणिकराव भाटे
९ . ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम
१० . गरोबा जागडे
११ . विनोद लहासे
१२ . नामदेव सागर
१३ . सोपान महासाळकर
१४ . गजानन सुरेश मानकर
१५ . सोपान मासळीकर

💁‍♂मिळालेल्या माहितीनुसार,
संत नामदेव महाराज पालखी सोहळय़ाची दिंडी पंढरपूरवरून आळंदीला जात होती. पालखी दिवेघाटात असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱया जेसीबीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जेसीबी थेट दिंडीत घुसला. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचे निधन झाले. तर १५ जण जखमी झाले. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

🗣 सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. त्याच ठिकाणी हा काही अंतरावर हा जेसीबी होता. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला आम्ही उतारावरून वाहन आणू नका अशी विनंती केली होती. परंतु अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्याने पहिले एका रिक्षाला धडक दिल्यानंतर चालकाचे जेसीबी वरील नियंत्रण सुटल्याने जेसीबी थेट दिंडीमध्ये घुसला काही वारकरी हे जेसीबी खाली आले त्यापैकी दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी राहुल भीमराव बंडगर यांनी सांगितली.Post Bottom Ad

#

Pages