😱 सरकारी इस्पितळांच्या तुलनेत खाजगी इस्पितळे सात पटीने महाग; राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचा अहवाल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 सरकारी इस्पितळांच्या तुलनेत खाजगी इस्पितळे सात पटीने महाग; राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचा अहवाल💁‍♂ खाजगी इस्पितळे ही सरकारी इस्पितळांच्या तुलनेत महागडी असतात. तरी चांगल्या उपचारांसाठी आणि आरोग्याच्या बाबतीत धोका नको म्हणून लोक खाजगी इस्पितळाचा मार्ग निवडतात. परंतु ही खाजगी इस्पितळे किती महाग आहेत याची आकडेवारी समोर आली आली आहे. सरकारी इस्पितळांच्या तुलनेत खाजगी इस्पितळे ही सात पटीने महाग असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

👉 सांख्यिकी विभागाने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात जुलै 2017 ते जून 2018 दरम्यानच्या आकडेवारीचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या अहवालानुसार सरकारी इस्पितळाअत इलाज करण्याचा सरासरी खर्च 4 हजार 452 रुपये आहेत तर हाच खर्च खाजगी इस्पितळात तब्बल 27 हजार 437 रुपये इतका आहे. शहरात हा खर्च 38 हजार 822 रुपयांच्या घरात आहे. म्हणजेच खाजगी इस्पितळात ग्रामीण आणि शहरी भागातील सरासरी खर्च हा 31 हजार 845 इतका आहे.


🏥 देशातील ग्रामीण भागात खाजगी आणि सरकारी इस्पितळात दाखल झाल्यास उपचारांसाठी सरासरी 16 हजार 676 रुपये खर्च करावे लागतात. शहरात हा खर्च 26 हजार 475 इतका आहे. एक लाख 13 हजार घरांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. देशातील हे चौथे सर्वेक्षण आहे. यापूर्वी 1995-96, 2004 आणि 2014 साली हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

Post Bottom Ad

#

Pages