📰 Today is National Journalism Day - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

📰 Today is National Journalism Day


📰 आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन

भूषण गरुड :- दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने 4 जुलै 1966 रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश होता.

🗞 सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर 16 नोव्हेंबर 1966 रोजी काऊंसिलचे काम सुरू झाले. म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय पत्रकारिता दिन' म्हणून साजरा होऊ लागला. 

🗞 हिकीचे 'बेंगॉल गॅझेट' हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात 1780 साली सुरू झाले. त्यानेच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले जाते. 

🗞 बाळशास्त्री जांभेकर यांनी 21 जून 1832 मध्ये मराठीत 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केले. दरम्यानच्या काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे देखील सुरू झाली. 

🗞 भारतातील पत्रकारिता तंत्रज्ञान व गुणवत्तेत एका दिशेने व वेगात विकास व्हावा प्रेस काऊंसिल स्थापन झाले. मात्र ते परिणामकारक ठरले नसल्याचे चित्र आहे. 

🗞 स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पत्रकारिता हे एक मिशन होते. मात्र स्वातंत्र्यानंतर ते उत्पादन बनले. आणीबाणीच्या वेळी तर पत्रकारितेवर काही निर्बंध लादले गेले होते. मग भ्रष्टाचार निर्मूलनासाठी पत्रकारिता पुन्हा मिशन बनली. 

🗞 सध्या सर्व सामाजिक दुष्परिणामांसाठी केवळ माध्यमांना दोष देणे योग्य नाही. बदलत्या काळाच्या या परिस्थितीत माध्यम समाजाला नवी दिशा देतात. मीडियाचा परिणाम समाजावर होतो. त्यामुळे त्यांची भूमिका तितकीच महत्वाची ठरते.   

🗞 राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने देशातील बदलत्या पत्रकारिचे तोपर्यंत स्वागतार्ह आहे जोपर्यंत ती आपली मूल्ये आणि आदर्शांची सीमा राखत नाही.

Post Bottom Ad

#

Pages