🔯 राशिभविष्य - रविवार दि. १७ नोव्हेंबर २०१९ ते शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०१९ - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🔯 राशिभविष्य - रविवार दि. १७ नोव्हेंबर २०१९ ते शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०१९🔯 साप्ताहिक राशीभविष्य

मेष :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करण्यात प्रयत्न करा. धंद्यात सुधारणा करण्यात प्रयत्न करा. वसूली करा. दादागिरीचा वापर करू नका. नोकरीत अडचणीवर मात करावी लागेल. संसारात वृद्ध व्यक्तीसाठी वेळ, पैसा खर्च होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे वाढतील. तुमच्याबद्दल कोणतीही अफवा उठवण्याचा प्रयत्न होईल. रागावर ताबा ठेवा. कोर्टकेस मध्ये योग्य तेच बोला. कला-क्रीडा क्षेत्रात तणाव होऊ शकतो. शोध मोहिम सोपी दिसेल पण अडचणी येतील. शिक्षणात आळस नको. व्यसन करू नका. शुभ दि. १७,२१

वृषभ :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अडचणी येतील. बोलतांना तुमचा राग अनावर होऊ शकतो. हिशोबात चूक होईल. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. कठीण काम लवकर करून घ्या. संसारात जबाबदारी पडेल. नातलगामध्ये गैरसमज होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही वरिष्ठांच्या संपर्ककात रहा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न ठेवा. शोध मोहिम फत्ते कराल. शिक्षणात मेहनत ठेवा. संगत योग्य ठेवा. शुभ दि. १७,१८

मिथुन :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. ओळखीमधून काम शोधण्याचा प्रयत्न करा. चांगले मित्र मिळतील. नोकरीत काम वाढेल. चतुराईने वरिष्ठांच्या बरोबर बोला. राजकीय-सामाजिक कार्यात पदासाठी, प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करावे लागतील. घाई करू नका. सौम्य धोरण ठेवा. संसारातील प्रश्न प्रेमाने सोडवा. तडजोड करा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत करा. कोर्टाच्या कामात आशादायक परिस्थिती दिसेल. शोध मोहिमेत सहकारी वर्गाला जवळ करा. नम्र रहा. शिक्षणात आळस नको. यश मिळेल. शुभ दि. २२,२३

कर्क :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाद होईल. तुम्हाला धंदा मिळवण्यासाठी सौम्य धोरण ठेवण्याची गरज आहे. संसारात क्षुल्लक तणाव होईल. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. त्रस्त व्हाल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा मिळेल. पदाधिकाराची शक्यता दिसेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नविन ओळख होईल. तुम्हाला उत्साह वाटेल. शोध मोहिम यशस्वी कराल. कोर्टकेस संपवण्याची जिद्द ठेवा. शिक्षणात हलगर्जीपणा करू नका. प्रेमात सावध रहा. शुभ दि. १८,१९

सिंह :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात प्रगती होईल. मागिल येणे वसूल करा. जमिनीसंबंधी काम होईल. संसारातील वाद-विवाद, गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न करा. अरेरावी केल्यास प्रश्न सुटणे कठीण होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. इतरांचा दबाव राहिल. मन अस्थिर होईल. कला-क्रीडा क्षेत्रात टिकाव धरता येईल. शोध मोहिमेत अडथळे येतील. शिक्षणात मेहनतीवर भर द्या. पुढे जाता येईल. चांगला सल्ला घेता येईल. शुभ दि. २२,२३

कन्या :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळवा. थकबाकी वसूल करा. नोकरीत प्रभाव टिकवता येईल. संसारात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. घर, वाहन, खरेदीचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडे अधिकार येईल. चातुर्याने वागा. परिस्थिती पाहून मत मांडा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस संपवता येईल. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. शिक्षणात मेहनत सोडू नका. शुभ दि. १७,१८

▪ तूळ :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात आळस न करता पटापट काणे करा. चांगली संधी कमी वेळ असणे. नवे काम मिळवा. पैसा उधळू नका. योग्य प्रकारे गुंतवणूक करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. संसारातील एखादी कमी भरून काढता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. पद मिळेल लोकप्रियता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. वाहन जपून चालवा. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात प्रगती कराल. शुभ दि. १३,१८

वृश्चिक :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र नेपच्यून प्रतियुती होत आहे. साडेसाती चालू आहे. २४ जाने २०२० रोजी वृश्चिक ची साडेसाती सुरू आहे. धंद्यात अडचणी मधून मार्ग काढावा लागेल. चर्चा वादाकडे जाऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव राहिल. रविवार अडथळा येईल. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा. संसारातील समस्या कमी होईल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. शिक्षणात पुढे जाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. २१,२२

धनु :- तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश , चंद्र बुध लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात नवा मार्ग मिळेल. नवे काम मिळेल. चर्चा सफल होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग होईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तणाव होईल. तुमच्यावर आरोप येईल. कोर्टाच्या कामात हलगर्जीपणा करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट जास्त घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहिल. अरेरावी कुठेही करू नका. शोध मोहिमेत विचारपूर्वक वागा. शिक्षणात मागे राहू नका. संसारात जबाबदारी वाढेल. खर्च होईल. शुभ दि. २२,२३

मकर :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती आहे. घरात मतभेद होईल. अनाठाई खर्च टाळावा लागेल. धंद्यात काम मिळेल. चर्चा यशस्वी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहिल. जवळचे लोक कठोर शब्द तुमच्याबद्दल बोलण्याची शक्यता सप्ताहाच्या मध्यावर आहे. मौल्यवान, महत्त्वाची वस्तु सांभाळा. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नविन ओळखीवर जास्त भरवसा ठेऊ नका. शोध मोहिम यशस्वी होईल. शिक्षणात लक्ष द्या. चांगली संगत ठेवा. नोकरीत बदल होऊ शकतो. शुभ दि. १८,१९

कुंभ :- या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदेशिर काम मिळेल. करार करता येईल. थकबाकी वसूल करा. संसारात दगदग धावपळ होईल. कामाचा व्याप वाढेल. तुमचे मन अस्थिर राहिल, पण तुमच्या बोलण्यात काहींना गर्व आहे असे वाटेल. तुम्ही इतरांचे हित साधण्याचा प्रयत्न कराल. कला-क्रीडा क्षेत्रात काटे की टक्कर देऊन यश खेचाल. शोध मोहिमेत दिशाभूल झाला तरी मार्ग मिळेल. शिक्षणात ध्येय समोर ठेवा. मन खंबीर ठेवा. शुभ दि. १७,२०

मीन :- या सप्ताहात धनु राशीत धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. क्षुल्लक कारणाने धंद्यात वाद होईल. राग वाढेल. तुम्हाला दूर दृष्टीकोनातून वागावे, बोलावे लागेल. थकबाकी वसूल करता येईल. संसारात जवळच्या माणसांना प्रेमाने वागवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. पद मिळेल. नोकरीत फायदेशिर बदल करण्याची संधी मिळेल. परदेशात जाण्याचे ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहिम फत्ते कराल. तुमच्या क्षेत्रात तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. कोर्टकेस जिंकाल. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. १७,१८

Post Bottom Ad

#

Pages