🎖अंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठय स्पर्धेत भारताला स्वर्ण पदक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

🎖अंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठय स्पर्धेत भारताला स्वर्ण पदक


🏆 रविवारी (ता. 17) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या आय.एफ.बी.बी डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठय स्पर्धेत भारतीय नौदलातील रोबी मैतेई मोरॅंगथेम (85 किलो गट) याने अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. 80 किलो गटाचा दास सुमन याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले; तर तिसऱ्या पदाचा मानकरी कझाकिस्तानचा शेरबेक टोकटोमुशेव ठरला. आठ गटांमध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जगभरातून 47 देशांतून 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुल येथे रात्री बाराच्या सुमारास रंगलेल्या अंतिम फेरीत भारताच्या रोबी मैतेई मोरॅंगथेम याला विजेता घोषित करण्यात आले. त्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे, फेडरेशनचे अरमन्डो (नतालिया), भारताचे सचिव डॉ. संजय मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

🎖अंतिम निकाल असा

 ▪ पुरुष क्‍लासिक 175 सेंमी गट
यजमान औरंगाबादचा सिद्धांत मोरे, भारत (सुवर्ण), अतीश मलाला कुमार, भारत (रौप्य), वेई चेंग चेन, चायनीज तैपेई (कास्य), रहेमान खान पठाण आमेर, भारत (चौथा), सुलतान खालेदी, यूएई (पाचवा). 
प्रो-कार्ड किताब
अदाम भगवान, भारत (प्रथम), सिद्धांत मोरे, भारत (द्वितीय), किशोर पाटील, भारत (तृतीय).

पुरुष क्‍लासिक 171 सेंमी गट
किशोर पाटील (सुवर्ण), श्रितिज चव्हाण (रौप्य), मोहंमद शाहरूख (कास्य), सलमान शेख (चौथा), वाल्मीक बागूल (पाचवा). 

पुरुष क्‍लासिक 175 सेंमीआतील गट
अदाम भगवान, भारत (सुवर्ण), अब्दुल्ला रसूल, इराक (रौप्य), शोकमीन हॉंग, मंगोलिया (कास्य), लव्हली शर्मा, भारत (चौथा), सुखदेव गलांडे, भारत (पाचवा). 

पुरुष 75 किलो गट
शेख नौशाद, भारत (सुवर्ण), पद्मनाभन सनाल, भारत (रौप्य), एन. चौरगे तुषार, भारत (कास्य), प्रमोद कुमार कृष्णा, भारत (चौथा), ची कॉग्न ली, मलेशिया (पाचवा), हरिदास टी., भारत (सहावा). 

पुरुष 60 किलो गट
बहादूर दधा राम, नेपाळ (सुवर्ण), सी. व्ही. अरुणदास, भारत (रौप्य), पी. दित जगेन्श, भारत (कास्य), खाता सिंग, भारत (चौथा), आर. बालाजी, भारत (पाचवा), दीपक सोनवणे, भारत (सहावा). 

पुरुष 70 किलो गट
जगदीश कम्पम, भारत (सुवर्ण), संकेत श्‍याम भाराम, भारत (रौप्य), चौत्रे कमाल, भारत (कास्य), शरीफ अल अमीन बांगलादेश (चौथा), आरिफ एसके, भारत (पाचवा), काथोड भाईर अरुण, भारत (सहावा). 

पुरुष 85 किलो गट 
रोबी मैतेई मोरॅंगथेम भारत (सुवर्ण), कुन चुंग लुई चायनीज, तैपेई (रौप्य), प्रल्हाद सिंग, भारत (कास्य) 

पुरुष 90 किलो गट
शेरबेक टोकटोमुशेव, कझाकिस्तान (सुवर्ण), अली हसन फरहान, इराक (रौप्य), फर्नांडो मार्टिनेज स्पेन (कास्य), सिंग टी. दुशांता, भारत (चौथा) सिंग आंबूस, भारत (पाचवा) अविनाश वाघुले, भारत (सहावा) 
पुरुष 100 किलो गट
जुबेर अहेमद - इराक (सुवर्ण), यू हसिउंग यांग - चायनीज तैपेई (रौप्य), काशीनाथ मयूर, भारत (कास्य), कुमार क्रिशन भारत- चौथा, के. नायडू कार्तिक भारत (पाचवा), संतोष वाघ,
भारत (सहावा) 
पुरुष 100 किलोपुढील गट
अली सलमान अब्दुल्ला, इराक, सुवर्ण, ज्ञानेश्वर किशोर, भारत रौप्य, ओंकार कापरे, भारत (कास्य) 

🗣 रोबी मैतेई मोरॅंगथेम - आय.एफ.बी.बी या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला संधी मिळाली. कमी वेळेत सराव करून मी या स्पर्धेत उतरलो. विचार केला नव्हता की इथे विजेता ठरू. जीवनात अनेक प्रसंग येतात; मात्र मेहनतीशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेक मेडल्स मिळवले. नेव्हीत आल्यानंतर 2015 पासून तयारी सुरू केली. ही स्पर्धा मला खूप टफ गेली. युवकांना एकच सांगणे आहे की, बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा नाही, तर यामुळे आपण तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत फिट राहतो. त्यामुळे युवकांनी या क्षेत्रात यावे.

Post Bottom Ad

#

Pages