🚨 मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना अटक करुन तीन परदेशी मुलींची केली सुटका - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

🚨 मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना अटक करुन तीन परदेशी मुलींची केली सुटका


💁‍♂ मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याकारवाईत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक करुन तीन परदेशी मुलींची सुटका करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान 14 हजार 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1) प्रियंका शंकर तोटे (वय 31, रा. रामचंद्र सभागृहाजवळ, वडगाव शेरी, पुणे)
2) स्पा मालक महेश श्रीनिवास गुंडट्टी यांना अटक करण्यात आली आहे.

🎯 शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील फॉरच्युन थाई स्पा नावाच्या मसाज सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. याकारवाईत दोन लोकांना अटक करत थायलंड येथील तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार राजू प्रभाकर बहीरट यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

👉 विमाननगर येथील फिनीक्स मॉल चौकातील ललवानी प्रेस्टीज मधील नानाश्री लॉजच्या दुसऱ्या मजल्यावर फॉरच्युन थाई स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांसह तीन थायलंड येथील महिलांची सुटका केली. आरोपींनी सुटका केलेल्या महिलांना स्पा सेंटरमध्ये थेरेपिस्ट म्हणून कामावर ठेवून त्याच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण 14 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

🚨 सदरची कारवाई,
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे रामचंद्र देसाई, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शना नुसार व सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार बाळासाहेब गायकवाड, किरण खुडे, हणमंत जाधव, पोलीस नाईक मनोज कुदळे, अशोक गवळी, रामदास घावटे, श्रीकांत बनसुडे, पोलीस कॉन्स्टेबल धांडे, महिला पोलीस नाईक नवले, शिवानी जगताप यांच्या पथकाने केली.

🔴 सदर घटनेचा पुढील तपास तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अजय वाघमारे करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages