🏬 गिरणी कामगारांसाठी ४ हजार घरांची सोडत डिसेंबरमध्ये - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🏬 गिरणी कामगारांसाठी ४ हजार घरांची सोडत डिसेंबरमध्ये💁‍♂ गिरणी कामगारांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) आनंदाची बातमी आहे. म्हाडातर्फे सुमारे ४००० घरांच्या सोडतीची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. 
घरांबाबत गिरणी कामगारांच्या पात्रता निश्‍चितीसंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने सोडतीला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली. 

🗣 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यासाठी उच्चाधिकार समितीने घातलेल्या काही अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी म्हाडा प्रशासनाने केली होती. म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी या दुरुस्तीला मंजुरी दिली. सोडत काढल्यानंतर म्हाडाचे अधिकारी गिरणी कामगारांची पात्रता निश्‍चित करतील, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे या सोडतीमधील प्रमुख अडचण दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

👉 सॉफ्टवेअरमध्ये बदल गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे सॉफ्टवेअर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. एखादा गिरणी कामगार यापूर्वी घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरला असल्यास नव्या सोडतीत त्याचा तपशील समजेल. हे काम १५ दिवसांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages