😱 आळंदी पालिकेच्या ब्रिटीशकालिन जुन्या इमारतीला अज्ञात व्यक्तींनी लावली आग - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

😱 आळंदी पालिकेच्या ब्रिटीशकालिन जुन्या इमारतीला अज्ञात व्यक्तींनी लावली आग🔥 आळंदी पालिकेच्या ब्रिटीशकालिन जुन्या बंद इमारतीला शनिवारी मध्यरात्री दिडच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी आग लावली. आगीच्या घटनेत पालिकेच्या इमारतीची लाकडी चिजवस्तू तसेच अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले सामान जळाले. पालिकेचे अग्निशमन दल, कर्मचारी आणि पोलिसांनी पाऊण तास शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

🔥 मध्यवर्ती ठिकाणीच पालिकेच्या इमारतीला लागलेली आग यात्रेच्या पार्श्वभुमिवर धक्कादायक असल्याची चर्चा आळंदीकरांमधे होती. बुधवार (ता. २०) पासून आळंदीत कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून भाविक येणार आहेत. वारीसाठी भाविकांना सोयी पुरविण्याच्या तयारीत पालिका प्रशासन आहे. दिवसभर काम करून पालिकेचे कर्मचारी झोपी गेले. अचनाक रात्री दिडच्या दरम्यान पालिकेच्या जुन्या बंद इमारतीला आग लावण्यात आली. मागच्या बाजूने आग लावल्याने सुरवातीला धुर येत होता. मात्र नंतर आगीचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱयांनी पोलिस आणि पालिका प्रशासनास कळविले. गस्त घालणाऱ्या पालिकेच्या वॉचमनच्या  ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रशासनास आगीची घटना कळविली. त्यानंतर पालिका कार्यालयाला लागूनच असलेली अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली. इमारतीच्या आवारतच अग्निशमन दलाची गाडी होती. मात्र सुरवातीला ती लवकर सुरू न झाल्याने अखेर शेजारच्या बॅरेलमधील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलातील विलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्निशमन गाडीच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. यावेळी मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी घटनेची माहिती घेतली.

🔥 आगीमध्ये १८६९ साली बांधलेली ब्रिटीशकालीन इमारत जळून खाक झाली. लाकडी इमारत असल्याने अधिक नुकसान झाले. दर्शनी बाजूने फारसे नुकसान झाले नाही. मात्र नुकतेच दोन दिवसांपूर्वी केलेल्या अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या संपूर्ण वस्तू जळाल्या. फ्लेक्स फलकही जळाले. पालिकेचे नशिब चांगले की या ठिकाणी आरोग्य विभाग वगळता इतर रेकॅार्डची कागदपत्रे नव्हती. तर इमारतीचे वीज पुरवठा यापूर्वीच बंद केला होता. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून या इमारतीतून पालिकेचे कार्यालय हलवून टाऊन हॉलच्या इमारतीत सुरू केले. यामुळे पालिकेचे कार्यलयीन नुकसान झाले नाही. दरम्यान पालिकेला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापुर्वी १९९८ च्या दरम्यान कागदपत्रे गहाळ करण्याच्या दृष्टीने अशीच आग लावण्यात आली होती. पालिका जाळण्याची तिसरी घटना आहे. 

🗣 दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी सांगितले की, थेट पालिका कार्यालयाच्या इमारतीलाच आग लागणे ही धक्कादायक बाब आहे. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु आहे.

Post Bottom Ad

#

Pages