😱 तरुणीच्या दुचाकीला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 तरुणीच्या दुचाकीला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू



💁‍♂ कामाला निघालेल्या तरुणीच्या दुचाकीस भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्वारगेटजवळील लक्ष्मीनारायण चौकातील उड्डाण पुलावर घडली. 

👉 सुप्रिया उदय मुल्ल्या (वय 22, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीचे वडील उदय मुल्ल्या (वय 48, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🚨 महिला सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सुप्रिया ही भांडारकर रस्त्यावरील एस. पी. एंटरप्रायझेस या कंपनीत कामाला आहे. ती नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी तिच्या ऑफिसला निघाली होती. तिची दुचाकी स्वारगेटजवळील लक्ष्मीनारायण चौकातील उड्डाण पुलावरून जात होती. त्या वेळी भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यामध्ये सुप्रियाला गंभीर दुखापत झाली. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला.

Post Bottom Ad

#

Pages