🔥इलेक्‍ट्रिक मोटारसायकलने घेतला अचानक पेट - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

🔥इलेक्‍ट्रिक मोटारसायकलने घेतला अचानक पेट


💁‍♂करमाळा तालुक्‍यातील शेलगावहून करमाळ्याला जात असताना बाळनाथ वीर यांच्या इलेक्‍ट्रिक मोटारसायकलने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली असून, फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे.

👉 सुदैवाने यात वीर यांना कोणतीही इजा झाली नाही. सोमवारी ही घटना शेलगाव (क) पासून करमाळा रस्त्यावर एक किलोमीटरवरील माने वस्तीजवळ घडली आहे. या घटनेमुळे इलेक्‍ट्रिक वाहन चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

🛵 वीर यांनी करमाळा येथून 2018 मध्ये इलेक्‍ट्रिक मोटारसायकल खरेदी केली होती. मोटारसायकलच्या बॅटरीची समस्या असल्यामुळे त्यांनी नुकतीच म्हणजे 29 सप्टेंबर 2019 ला 24 हजार 500 रुपये किमतीची नवी बॅटरी बसवली होती. वीर हे कामानिमित्त करमाळ्याला जात असताना अचानक गाडी बंद पडली म्हणून ते खाली उतरले. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेताच मोठ्या संख्येने लोकांनी या परिसरात गर्दी केली.

Post Bottom Ad

#

Pages