🚨 सीआयडी आणि सीबीआय यादोन्ही तपास यंत्रणा मधील नेमका फरक तरी काय? हे जाणून घेऊ या...!!! - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

🚨 सीआयडी आणि सीबीआय यादोन्ही तपास यंत्रणा मधील नेमका फरक तरी काय? हे जाणून घेऊ या...!!!


💁‍♂ चित्रपटांमध्ये सीआयडी आणि सीबीआय ही नावं बरेचदा ऐकायला मिळतात. या दोन्ही तपास यंत्रणा आहेत. एखाद्या गुन्ह्याची उकल करण्याची जबाबदारी तपास यंत्रणांवर सोपवली जाते. या दोन्ही तपास यंत्रणांचं काम सारखंच असतं. मग या दोहोंमधला नेमका फरक तरी काय? जाणून घेऊ या....!!! 

🚔 सीबीआय म्हणजे 'सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'. सीबीआय ही भारत सरकारची प्रमुख तपास यंत्रणा आहे. सीबीआय विविध गुन्हे तसंच देशाच्या सुरक्षेशी संबंधित विविध घटनांच्या तपासाचं काम करते. केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयाकडून सीबीआयकडे गुन्ह्याचा तपास सोपवला जातो. या तपास यंत्रणेची स्थापना १९४१ मध्ये करण्यात आली असली, तरी १९६३ मध्ये तिला सीबीआय हे नाव मिळालं. सीबीआय देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही कार्यरत असते.

🚨 सीबीआय म्हणजे काय?
सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे.
▪ केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते.
▪ 1941 साली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट आणि 1963 ला सीबीआय म्हणून ओळख
▪ संपूर्ण देश हे कार्यक्षेत्र आहे.
▪ लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे, धोरणात्मक विभाग, विशेष गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग हे कार्यक्षेत्र
▪ देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी
▪ गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो.
▪ राज्य सरकारच्या विनंतीवर राज्यातील प्रकरणांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते.
▪ डीएसपीई म्हणजेच दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 1946 अंतर्गत तपासाचे अधिकार
▪ सीबीआय संचालकांची नियुक्ती लोकपाल कायद्यानुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती करते.

-----------------------------------------

🚔 सीआयडी म्हणजे 'क्राईम इन्व्हेस्टिगेशकन डिपार्टमेंट'. ही तपास यंत्रणा राज्य सरकारच्या अखत्यारीत असते. म्हणजे सीआयडी राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करते. या तपास यंत्रणेला हत्या, दंगल, अपहरण चोरी यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी सोपवली जाते. ब्रिटिशांनी १९०२ मध्ये सीआयडीची स्थापना केली. ही संस्था राज्यपातळीवर काम करते.

🚨 सीआयडी म्हणजे काय?
सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट
▪ राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस विभागातील ही यंत्रणा राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते.
▪ 1902 साली ब्रिटीश सरकारच्या काळात स्थापना
▪ संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र आहे.
▪ फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा आणि सीआयडी, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार
▪ पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी केली जाते.
▪ राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतं.
▪ सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात.

Post Bottom Ad

#

Pages