😱कात्रज घाटरस्त्यात तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्‍यता - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, November 27, 2019

😱कात्रज घाटरस्त्यात तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्‍यता💁‍♂कात्रज घाटरस्त्यात दरीलगत अनेक ठिकाणी तुटलेले संरक्षक कठडे आ वासून उभे आहेत. तुटलेल्या या संरक्षक कठड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. कात्रज घाटातील प्रवास असुरक्षित झाला आहे. अशा परिस्थितीत या कठड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे काय, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

👉कात्रज घाटात सोमवारी (ता. २५) उताराला ‘शिवशाही’ बस कोसळून अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू, तर ३२ प्रवासी जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर कात्रज घाटरस्त्यावरील प्रवास किती सुरक्षित आहे, याचा ‘सकाळ’ने आढावा घेतला. या वेळी कात्रज घाटरस्त्यावर दरीलगतच्या संरक्षक कठड्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याचे उघड झाले. या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्‍यता निर्माण झाली असून, त्यामुळे कात्रज घाटातील प्रवास असुरक्षित झाला आहे. कात्रज घाट सुमारे सहा किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील दोन किलोमीटर रस्त्यालगत दरीचा भाग आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या दरीलगतच्या रस्त्याच्या संरक्षक कठड्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी कठडेही तुटले आहेत. घाटरस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. या वाढलेल्या गवतामुळे वाहनचालकांना कठडे आणि रस्त्यालगतचा चर याचा अंदाज येत नाही. घाटरस्त्यावर विजेचे खांब नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्यावेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही बांधकाम विभाग याकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे दिसत आहे. 

🗣संपूर्ण कात्रज घाटरस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही; तर दरीच्या बाजूला ठिकठिकाणी कठडे तुटले असून, वाहन खाली कोसळून दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर बांधकाम विभागाला जागा येणार आहे का, अशी प्रतिक्रिया प्रवासांनी व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages