😱आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तरतूद सध्या अस्तित्वात नाही; केंद्र सरकार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 30, 2019

😱आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तरतूद सध्या अस्तित्वात नाही; केंद्र सरकार💁‍♂आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याची माहिती केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी संसदेत दिली. 'शेतकऱ्यांची सावकारी कर्जाच्या जाळ्यातून सुटका करण्यासाठी सरकारचा बँकांद्वारे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीला प्रोत्साहन देण्यावर जोर आहे', असे सरकारने म्हटले आहे.

▪ शेती व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासंबंधीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त माहिती दिली.

 ▪ 'शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. पण, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तरतूद सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नियमांत नाही', असे ते आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याशी संबंधित एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. 'शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजाने देण्यात येणारे कर्ज केवळ कृषी कार्यासाठी आहे. 

▪ यात कृषी व्यवसायाचा समावेश नाही. शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी सरकार संस्थात्मक कर्जांतर्गत सर्वच बँकांना पीक कर्ज सुलभ पद्धतीने जारी करण्यास प्रोत्साहन देत आहे', असे रुपाला म्हणाले. 

▪ 'वित्तीय संस्थांद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करवून देण्याचे २०१६-१७ मधील ९ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य २०१९-२० मध्ये वाढवून १३.५० लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. या मदतींतर्गत गत ३० ऑगस्टपर्यंत ९.९६ कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे', असेही रुपाला यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages