🚨 पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट १ ने केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 21, 2019

🚨 पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट १ ने केली अटक💁‍♂ बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे. आरोपीकडून 1 पिस्तुल व 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत.


👉 उमेश रमेश कोकाटे (वय ३४, रा.पोकळे वस्ती, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केल्याचे नाव आहे. अटक केलेला आरोपी कोकाटे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न व आर्म्स ऍक्ट नुसार पुणे शहरामध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशंम यांनी सराईत गुन्हेगार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशा नुसार गुन्हे शाखा युनिट एकचे उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार वसावे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस शिपाई गजानन सोनुने, पोलीस नाईक सुधीर माने व पोलीस शिपाई तुषार माळवदकर असे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव व पोलीस नाईक इम्रान शेख यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार उमेश कोकाटेकडे पिस्तुल असून तो बिबवेवाडी भागात आला आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट १ च्या तपास पथकाने बकुळ हॉल समोर सापळा रचून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी देशी बनावटीचे पिस्तूल व ०४ जिवंत काडतूसे असा एकूण ५० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages