🧐 राज्यपाल व त्यांची कामे व विशेषाधिकार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

🧐 राज्यपाल व त्यांची कामे व विशेषाधिकार⚡ राज्यपाल हे राज्यप्रमुख असतात. म्हणजे एकप्रकारचे नामधारी प्रमुख. 

👉 कायद्यात अशी तरदूत आहे की जो पक्ष जास्त बहुमत सिद्ध करू शकेल त्यास सरकार स्थापन करण्यास आमंत्रित केले जाते यामध्ये दोन पक्ष मिळून सुद्धा बहुमत सिद्ध करू शकतात।

👉 जर कुणालाही बहुमत नसेल तर राज्यपालांनी आपली सदसद्विवेकबुद्धी वापरून जो पक्ष स्वबळावर किंवा इतर पक्षांशी युती करून स्थिर सरकार देऊ शकतो त्याला पाचारण करावे असा संकेत आहे.

👍 काही प्रमुख कामे:

1⃣ मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे. (निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांच्या विनंतीवरून)
2⃣ विधानपरिषदेत आमदारांची नेमणूक करणे. (शिफारशीवरून)
3⃣ विधानसभा बरखास्त करणे (मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार)
4⃣ उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्यास राष्ट्रपतीला मदत करणे
5⃣ राज्यात तयार होणारे विधेयक कायद्यात बदलवण्यासाठी राज्यपालाची सही लागते
6⃣ आमदाराने गैरवर्तन केल्यास त्याचे निलंबन करणे
7⃣ आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीने परवानगी दिल्यास मंत्रिपरिषद बरखास्त करून स्वतः राज्य चालवणे. 

📍 राज्यपालांचे विशेषाधिकार 

✔ राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही.
✔ राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरु केली जाणार नाही.
✔ राज्यपालाना अटक करण्यासाठी त्यांच्या पदावधीदरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही.
✔ राज्यपालाने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्याच्या पदावधीदरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही, त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे दोन महिने संपल्याशिवाय करता येणार नाही.

Post Bottom Ad

#

Pages