💥 वर्षभरात नूतनीकरण न केल्यास वाहन परवाना होणार रद्द! - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 25, 2019

💥 वर्षभरात नूतनीकरण न केल्यास वाहन परवाना होणार रद्द!


⚡ नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता एका वर्षाच्या आत वाहन परवान्याचे नूतनीकरण न केल्यास परवाना रद्द होऊन, चालकाला नव्या परवान्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे.

💁‍♂ दरम्यान यापूर्वी वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठीची मुदत 5 वर्षांची होती. मात्र, नव्या कायद्यानुसार, हा कालावधी तब्बल 4 वर्षांनी कमी केला आहे.

👀 मोटार वाहन कायद्यात सप्टेंबरमध्ये सुधारणा केल्यानंतर नवीन कायदा आला. त्यात नूतनीकरण 1 वर्षात करणे बंधनकारक आहे. पूर्वी नूतनीकरण तारीखेनंतर 5 वर्षांत दंड भरून नूतनीकरण करता येत होते.

🤷‍♂ नवीन नियम माहीत नसल्याने अनुभवी वाहनचालकांनाही रांगेत उभे राहून ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत आहे. त्यामुळे सरकार फसवत असल्याची भावना चालकांमध्ये झाली आहे.

🛣 रस्त्यांचा आकार कायम बदलत आहे. त्यामुळे नवीन नियम व रस्त्यांशी चालकांना जुळवून घेता येते का, यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे,' असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages