✈ नौदलाचं लढाऊ विमान कोसळलं; पायलट थोडक्यात बचावले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

✈ नौदलाचं लढाऊ विमान कोसळलं; पायलट थोडक्यात बचावले💁‍♂ गोव्यात प्रशिक्षणादरम्यान भारतीय नौदलाचं 'मिग 29 के' हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. विमानातील दोन्ही पायलटनी प्रसंगावधान राखून पॅराशूटच्या मदतीनं उड्या मारल्यानं ते थोडक्यात बचावले. 


🧐 नेमके काय घडले? :

▪ 'आयएनएस हंसा' या गोव्यातील हवाई तळावरून विमानाने 2 पायलटसह उड्डाण केले होते. त्यानंतर काही काळातच एका पक्षानं विमानाला धडक दिली.
 विमानाच्या इंजिनने पेट घेतल्याने विमानाला आग लागली. हे समजताच दोन्ही पायलट पॅराशूटच्या मदतीनं तात्काळ खाली उतरले.

▪ स्थानिक लोकांनी थोडक्यात बचावलेल्या पायलटची मदत केली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी पायलटची नावे आहेत. 
📍 दरम्यान, दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Post Bottom Ad

#

Pages