🚫 नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🚫 नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार📢 देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. येत्या काळात रस्त्यावर नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला, नियमभंग करणाऱ्याकडून जो दंड वसूल केला जाईल, त्या दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्या बाबतचा कायदा लवकरच अमलात येईल,’ असे सूतोवाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.

👉 सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठातर्फे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी या वेळी उपस्थित होते.

🗣 गडकरी म्हणाले, की आजकाल पार्किंगसाठी जागा मिळत नाही. दिल्लीत माझ्या कार्यालयाच्या बाहेर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही समस्या सोडवण्यासाठी ईझी पार्क ही तंत्रसुसज्ज पार्किंग इमारत उभारण्यात आली. आता एनएचआयडीसीच्या माध्यमातून मोठय़ा शहरांमध्ये अशा ५० पेक्षा अधिक इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचा व्यावसायिक वापरही होईल. बसस्थानकांमध्ये उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून तेथे ‘बस पोर्ट’ उभारण्यात येईल. बस पोर्टला दळणवळण सोयींनी जोडले जाईल.

Post Bottom Ad

#

Pages