🤔 राज्यातील घडामोडीवर सकाळपासून कोण-काय म्हणाले? - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 23, 2019

🤔 राज्यातील घडामोडीवर सकाळपासून कोण-काय म्हणाले? 💁‍♂ सकाळपासून राज्यात ज्या घडामोडी घडत आहेत. त्यावर सर्वच पक्षीयांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर एक नजर...    

1. संजय राऊत : अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते आयुष्यभर तडफडत राहतील. 

2. शरद पवार : अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. 

3. नवाब मलिक : आमदारांच्या हजेरीसाठी त्यांच्या सह्या घेतल्या होत्या, मात्र त्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. 

4. रामदास आठवले : भाजपने हा निर्णय घेत शिवसेनेला लटकवून कॉंग्रेसला फटकारले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडकवले आहे.

5. अभिषेक मनु सिंघवी : पवारजी तुस्सी ग्रेट हो...जर हे असेल तर...अजूनही विश्वास बसत नाही.

6. नितीन गडकरी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन.

7. पूनम महाजन : महाराष्ट्रातील सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे.

8. चंद्रकांत पाटील : शिवसेनेच्या आततायीपणाला शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार आहेत. संजय राऊतांना शिवसेनेची वाट लावली. 

9. चित्रा वाघ : दादा, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे.

10. सचिन सावंत : जो कोणी फुटण्याचा विचार करत आहे त्याने उदयनराजे भोसले यांचा धडा घ्यावा!

👉 दरम्यान 'पक्षात आणि कुटुंबात फूट' असे सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल होत आहे. यावर त्यांनी मी दुपारी साडे बारा वाजता माध्यमांशी सविस्तरपणे बोलेल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Post Bottom Ad

#

Pages