😱 नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजकाचे राहत्या घराच्या जवळून अपहरण - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

😱 नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजकाचे राहत्या घराच्या जवळून अपहरण💁‍♂ नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज सकाळी राहत्या घराच्या जवळून अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

👉 याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
आज पहाटे करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घातले. हुंडेकरी यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले.

🗣 हुंडेकरी यांनी सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले होते, असे  प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे.

🚨 अपहरणाच्या ह्या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages