😱 कात्रज परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

😱 कात्रज परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले💁‍♂ पुणे शहरात दूध घेऊन घरी येत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना रविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील ओशियन पार्क सोसायटीच्या परिसरात घडली. याप्रकरणी कमल झुंबरलाल बाफना (वय 74 , रा. कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बाफना या नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्यांच्या सोसायटीजवळील डेअरीमधून दूध आणण्यासाठी गेल्या होत्या. दूध घेऊन त्या परत येत होत्या. त्याचवेळी दुचाकीवरुन दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. फिर्यादी पत्ता सांगत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 36 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली.

Post Bottom Ad

#

Pages