😱 लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रियसीचा केला खून - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रियसीचा केला खून💁‍♂ प्रेम प्रकरणातून प्रियसीचा हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये घडली आहे. गळ्यावर चाकूने वार करत प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले.

👉 सुमन चौहान वय-२२ असे खून झालेल्या प्रियसीचे नाव आहे. तर बरकत खलील अल वय-२० असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. सुमने ने प्रियकर बरकत ला लग्नास नकार दिला होता यातूनच त्याने प्रियसीचा खून केला आहे अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी बरकत आणि सुमन हे भोसरी मधील एका कंपनीत कामाला आहेत. जुन्या कपड्याचे तेथे हॅन्ड ग्लोज बनवले जातात. गेल्या तीन महिण्यापासून प्रियसी सुमन ही त्याच ठिकाणी काम करत होती. तीन दिवसांपूर्वी सुमन तिच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथून आली. तीच लग्न होणार असल्याच बरकत याला समजलं होत. त्यामुळे आज ती कामावर आली असता, सर्व कामगार नऊ वाजता नाष्टा करण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा, सुमन आणि बरकत हे दोघेच कंपनीत होते. हा एकांत पाहून बरकत ने सुमन ला आपण लग्न करू असे म्हटले. यावर सुमन ने नकार दिला. नकार दिल्याने राग सहन झाला नाही आणि बरकत ने सोबत असलेल्या चाकू ने सुमनच्या गळ्यावर सपासप वार केले, यात सुमनचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी प्रियकर बरकत हा फरार होण्यात यशस्वी झाला होता. मात्र, भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, बरकत हा पुणे रेल्वे स्थानकात असून तो पळून जाण्याचा तयारीत आहे असं समजलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी भोसले, विधाते यांनी रेल्वे स्थानकात जाऊन आरोपीचा शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. तेवढ्यात गोरखपूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना फिल्मीस्टाईल बरकत ला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. सुमन ही दोन भावासह भोसरीमध्ये राहात होती. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages