🚨कार्तिकी वारीत दानपेटीतील पैसे मोजण्याऱ्या स्वयंसेवकाने पैशांचा अपहार प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 28, 2019

🚨कार्तिकी वारीत दानपेटीतील पैसे मोजण्याऱ्या स्वयंसेवकाने पैशांचा अपहार प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल💁‍♂आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी मंदिरात कार्तिकी वारीत दानपेटीतील पैसे मोजण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब विष्णू पाटील (रा. वाळवा) याच्यावर दानपेटीतील पैशांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

👉याप्रकरणी फिर्याद आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांनी दिली. आळंदीत नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या दक्षिणेच्या रकमेची मोजणी करण्यासाठी कार्तिकी वारीत दरवर्षी स्वयंसेवक नेमले जातात. दरम्यान, पाटील याने स्वयंसेवक म्हणून संस्थानकडे अर्ज केला होता. २० नोव्हेंबरपासून पाटील आळंदी देवस्थानमध्ये पैसे मोजण्यासाठी आला होता. तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी देवस्थानचे सह व्यवस्थापक बाळासाहेब भंडारकौठे यांनी वीर यांना सांगितले की, दानपेटीतील पैसे ज्या ठिकाणी मोजतात त्या खोलीतील सीसीटीव्ही पाहिले असता, त्यामध्ये आठच्या सुमारास पाटील याने त्याच्या मांडीखाली पाचशे रुपयांच्या सहा नोटा ठेवलेल्या मला दिसल्या. या नोटा त्याने मोजणी झालेल्या ट्रेमध्ये ठेवल्या नाहीत. दरम्यान, यात्रा सुरू असल्याने देवस्थानने याबाबत काही केले नाही. पाटील याला तत्काळ पैसे मोजू नकोस व निघून जा, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर मात्र शहरात चोरीच्या घटनेची चर्चा झाली. यामुळे देवस्थानला पाटील विरोधात फिर्याद देणे भाग पडले. पाटील विरोधात तीन हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages