😱 कोथरूड येथील पेठे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हवेत गोळीबार करत दुकानातील दागिने लुटले - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 कोथरूड येथील पेठे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हवेत गोळीबार करत दुकानातील दागिने लुटले💁‍♂ पुण्यातील कोथरूड भागातील पेठे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हवेत गोळीबार करत, दुकानातील दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी भरदिवसा घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

🚨 पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,
कोथरूडमधील आनंदनगर येथील मुख्य चौकात पेठे ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास काही ग्राहक दागिण्यांची खरेदी करत होते. याच दरम्यान दोन व्यक्ती दुकानात शिरल्या आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर दुकानातील सर्वांना धमकावून, त्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. नेमके किती लाखांचे दागिने त्यांनी पळवले आहेत. या संदर्भात चौकशी सुरू असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत असल्याची कोथरूड पोलिसांनी माहिती दिली आहे.

Post Bottom Ad

#

Pages