🌉 सागरीसेतू वरळी सी लिंक...काही खास गोष्टी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, November 16, 2019

🌉 सागरीसेतू वरळी सी लिंक...काही खास गोष्टीभूषण गरुड :- वांद्रेहून दक्षिण मुंबईला जोडणारा आणि मुंबईला सुपरफास्ट करणारा सागरी पुल म्हणजेच वांद्रे-वरळीचा सागरीसेतू. अर्थात वांद्रे-वरळी सी लिंक. जाणून घेऊ या पुलंविषयी काही खास 

1⃣ या पुलाचं मुळ नाव आहे, राजीव गांधी सी लिंक. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या लिंकला दिले असले तरीही या पुलाची ओळख वांद्रे-वरळी सी लिंक अशीच आहे.

2⃣ हा पूल इतका मजबूत आहे की या पुलाची तुलना 50 हजार अफ्रिकन हत्तींसोबत केली जाते. 

3⃣ भारतातील हा पहिला असा सी लिंक आहे, ज्यावर तब्बल 8 लेन आहेत.

4⃣ कुतुब मिनारच्या 63 पट उंच या सीलिंकची उंची आहे. 126 मीटर उंचीचा हा पूल असून 66 फुटांचा हा पूल आहे.  

5⃣ या सीलिंकच्या 8 लेनपैकी सुरुवातीचे 4 लेन हे 30 जून 2009 साली सुरू झाले आणि संपूर्ण पूल 24 मार्च 2010 साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

6⃣ या पुलामुळे वांद्र्यातून वरळीत येण्यासाठीचा तास- दीड तासांचा प्रवास अवघा 20 ते 30 मिनिटात शक्य झाला आहे. 

7⃣ हा पुल सुरू झाला तेव्हा सुरुवातीचे 30 दिवस या पुलावर मोफत प्रवास करता येत होता. मात्र त्यानंतर या लिंकवर येण्यासाठी 60 रुपये टोल भरण्याचा नियम लागू करण्यात आला. 

8⃣ 1999 साली शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या लिंकच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. 

9⃣ या पुलाचे काम अवघ्या 5 वर्षात होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही विरोधामुळे या पुलाचे काम 10 वर्षांनी पूर्ण झाले.

🔟 या लिंकचं भूमिपूजन झालं तेव्हा या कामाला 660 कोटींची तरतुद करण्यात आली होती. मात्र कालांतराने या कामासाठी 1600 कोटी खर्च करण्यात आला.

🤝🏻 हे संपूर्ण बांधकाम भारतीय कारागिरांसोबतच जगभरातील 11 देशातील आर्किट्रेक्चर संस्थानी या कामाला हातभार लावला आहे.

Post Bottom Ad

#

Pages