🚆 जानेवारी २०२० मध्ये डेक्कन क्वीन नव्या रूपात दिसणार - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

🚆 जानेवारी २०२० मध्ये डेक्कन क्वीन नव्या रूपात दिसणार🚂 पुणे-मुंबई या मार्गावर प्रवास करण्यासाठी १ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणी कमी कालावधीतच प्रसिद्ध झाली. या ‘डेक्कन क्वीन’ चे रूप नव्या वर्षांच पालटलेले दिसणार आहे. या गाडीला २५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक आणि वाढीव डबे जोडण्यात येणार असून, रंगसंगतीत देखील आकर्षक बदल करण्यात येणार आहे.

🚊असे आहे ‘डेक्कन क्वीन’ चे वैशिष्ट्ये
पुणे-मुंबई नॉन-स्टॉप असणाऱ्या या गाडीची दखल लिम्का बुकमध्ये घेण्यात आलेली असून तिला ‘ISO’ गुणवत्तेचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.
‘डायनिंग कार’ हे वैशिष्ट्य असणारी ही गाडी पुणे-मुंबई रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सेकेंड होम म्हणून ओळखली जाते. याच गाडीचा चेहरा नव्या वर्षात बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये डेक्कन क्वीन नव्या रूपात दिसणार आहे.

🚆 असे असेल नवे रूप
▪ १९९५ पासून डेक्कन क्विन ही ट्रेन सुरू आहे. सध्या या गाडीला १७ बोगी असून आता या गाडीला LHD प्रकारात असणारी आत्याधुनिक २० बोगी अधिक जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
▪ गाडीच्या बाहेरील बाजूस आकर्षक रंगसंगती करण्यात येणार असून डायनिंग व्यवस्था करण्यात येणार आहे. या डायनिंग कारमध्ये ३२ आसनांची व्यवस्था वातानुकूलित करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages