🚨 आर्थिक व्यावहारातून मारहाण करत रस्त्यावर विवस्त्र करून फिरवणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 21, 2019

🚨 आर्थिक व्यावहारातून मारहाण करत रस्त्यावर विवस्त्र करून फिरवणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी केली अटकभूषण गरुड : आर्थिक व्यावहारातून तरुणाला मारहाण करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला आहे. याघटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मन सुन्न करणारी घटना कोंढवा परिसरात घडली आहे.  याप्रकरणी घटनेप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पीडित 31 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

👉 31 वर्षीय तरुणाला विवस्त्र करून फिरवणारे आरोपी👇🏻
1⃣ सेहर गुलाम गौस शेख [वय 36, रा. 470,भवानी पेठ,पुणे]
2⃣ मतीन उर्फ नौशाद खान [वय 24, रा. 717, भवानी पेठ, चुडामण तालीम, पुणे]
3⃣ राहील इसरार शेख [वाय 25, रा. 722, चुडामन तालीम, भवानी पेठ, पुणे]
4⃣ उबेद अली शेख [वय 24, रा. लक्ष्मी नगर, गल्ली नंबर 84, पर्वती, पुणे]
5⃣ सिद्दिक इद्रीस शेख [वय 28, रा. 724, भवानी पेठ, पुणे]
यांना कोंढवा पोलिसांनी अटक करत फरार 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

🔴 व्हिडीओमध्ये काही व्यक्ती फिर्यादीस  विवस्त्र अवस्थेत तरुणाची धिंड काढत असताना त्याला मारहाण देखील करत आहेत. रात्रीच्यावेळी हा प्रकार घडला आहे. सिगारेटचे चटके देेखील तरुणाला देण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी हे वाहन विक्री करणारे एजंट आहेत. तर मारहाण करण्यात आलेला तरुण गॅरेज चालक असल्याची माहिती पोलिसांना मिळताच👇🏻
◼ श्री सुहास बावचे मा पोलीस उपायुक्त सो पाईप परिमंडळ 5 पुणे शहर.
◼ श्री. सुहास कलगुटकर मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. वानवडी विभाग पुणे शहर.
◼ श्री. मुरलीधर करपे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
◼ श्री. महादेव कुंभार मा. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सो. कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
◼ श्री. संदीप मधाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
◼ श्री. चेतन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
◼ श्री. संतोष शिंदे पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

🚨 कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी मन सुन्न करणाऱ्या घटनेची दिलेल्या माहितीनुसार,
31 वर्षे पिडीत तरुणाचा गॅरेज व्यवसाय असून तो मूळचा गुलबर्गा, कर्नाटक येथील आहे. फिर्यादीचे आरोपी सेहर व मतीन हे मित्र आहेत. आरोपी यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने आरोपी मेहेर हा त्यांच्या ओळखीने महागड्या इम्पॉर्टंट कार दुरूस्तीसाठी फिर्यादीकडे पाठवत होता. महागड्या इम्पॉर्टंट गाड्या दुरुस्ती करण्यासाठी आणलेल्या गाड्यांमध्ये कमिशन स्वरूपात वेळोवेळी खंडणी मागत असत. आरोपींनी एक जॅग्वार कंपनीचे कार दुरुस्तीसाठी फिर्यादीकडे पाठवली होती. आरोपींनी फिर्यादी गाडी दुरुस्तीच्या खर्चापेक्षा जास्त 5 लाख रुपये अधिक फिर्यादी यांना घ्यायला सांगितले होते. मात्र फिर्यादी यांनी गाडी दुरुस्ती करून 2.50 लाख रुपये घेतल्याने आरोपी यांनी फिर्यादीकडे 4.50 लाख रुपयांची मागणी करत शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी गॅरेज मधून फिर्यादीचे अपहरण करत फिर्यादीचा अंगावरील कपडे फाडून त्याला विवस्त्र करून मारहाण करत अंगावरील 2.45 तोळ्याची सोन्याची चैन व खिशातील 17 हजार रूपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबून त्याठिकाणावरून नेले. इतर साथीदारांच्या मदतीने दिल्ली पब्लिक स्कूल जवळ, न्याती इस्टेट मंमदवाडी, पुणे तसेच वानवडी मिलिटरी परिसर व डाउन टाउन, खराडी,पुणे येथे विवस्त्र अवस्थेत फिर्यादीला गाडी मधून खाली उतरवून पट्ट्याने लाकडी दांडक्याने रोडने फिर्यादीच्या तोंडावर, कानावर, पाठीवर, पोटावर इतर ठिकाणी मारहाण करत अंगावर सिगारेटचे चटके देत विवस्त्र अवस्थेत धिंड काढत त्याचे चित्रीकरण केले. रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी 3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या गॅरेज जवळ सोडून दिले. याघटनेप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपीन विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये 898/2019 भा.द.वि कलम 395,385,364 अ,324,323,506 प्रमाणे गुन्हा दाखल करत 5 आरोपींना अटक केली आहे तसेच फरार 3 आरोपींचा कोंढवा पोलीस शोध घेत आहेत. 
सदर घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages