🚨 पादचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 18, 2019

🚨 पादचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी केली अटक💁‍♂ फुटपाथवरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) रात्री आठच्या सुमारास सारसबाग बस स्टॉप जवळील फुटपाथवर घडला होता. आरोपींनी पादचाऱ्याला धमवाकून खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेत पसार झाले होते. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या.

👉 रोहित आण्णा रणदिवे (वय-27 रा. पर्वती पायथा), ओंकार काळुराम ताटे (वय-23 रा निलायम टॉकिज ब्रिजजवळ, दत्तवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमित सपकाळ (वय-36 रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अमित सपकाळ हे रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास सारसबाग येथील फुटपाथवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी अमित यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये घेऊन फरार झाले. अमित सपकाळ यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद देताना त्यांनी आरोपींचे केलेल्या वर्णनानुसार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस शिपाई संतोष कांबळे आणि शिवाजी सरग यांना आरोपींची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.बी जायभाय करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages