😱पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात; ४ जण ठार तर एक जण गंभीर जखमी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, November 29, 2019

😱पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात; ४ जण ठार तर एक जण गंभीर जखमी💁‍♂पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर गॅस टँकर आणि स्वीफ्ट गाडीत झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीहून मुंबईला परत जात असताना एक्सप्रेस हायवेवरील रसायनी येथे सकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कार चालक व तीन महिला यांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.


👉पुण्याहून मुंबईकडे गॅस टँकर जात होता. रसायनीजवळ पाठीमागून आलेल्या स्वीफ्ट कारने जोरात धडक दिली. त्यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.


🚑अपघातातील चारही महिला मुंबईच्या राहणाऱ्या  असून त्या सांगली येथे लग्नासाठी गेल्या होत्या. सांगली येथील एक कार घेऊन त्या पुन्हा मुंबईला परत जात होत्या. चालक सांगलीचा आहे. एक्सप्रेस हायवेवर रसायनी जवळ भरधाव जाणाऱ्या कारचालकाला पुढे जाणाऱ्या गॅस टँकरला दिसलाच नाही. कार गॅस टँकरच्या पाठीमागून आत घुसली. रासायनी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून त्यांनी गॅस टँकर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. अपघातातील महिलांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Post Bottom Ad

#

Pages