📢 वाहतूक पोलीस, महापालिकेचे पथ विभाग व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केल्या सूचना - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 17, 2019

📢 वाहतूक पोलीस, महापालिकेचे पथ विभाग व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केल्या सूचना👉 स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गात दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीला नागरिकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. शनिवारी वाहतूक पोलीस, महापालिकेचे पथ विभाग व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी अनेक सूचना केल्या.

🗣 स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गवर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरसेवक योगेश ससाणे, वाहतूक पोलीस विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ वाकुडे, वानवडी पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडीक, हडपसर डिव्हीजनचे म्हेत्रे, सहायक महापालिकेचे पथ विभागाचे उपअभियंता श्रमिक शेवते, पीएमपीएलचे अधिकारी दीपा ससाणे यांनी पाहणी केली. फातिमानगर ते गाडीतळ मार्गाचाही यावेळी अभ्यास करण्यात आला. यावर तात्काळ उपाय योजना कराव्यात, अन्यथा बीआरटीचे छोटे दुभाजक आम्ही काढून टाकू, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.

💁‍♂ खालील सर्व सूचना व उपाययोजना जर अंमलात आणल्या तर सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नक्कीच तोडगा निघू शकेल, असा विश्वास ससाणेसह वाकुडे, विभांडीक, म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

▪ सुचना क्र. १ :- जांभुळकर मळा ते बिटी कवडे रोड सिग्नल चौक सर्व्हिस रोड बंद करून फुटपाथ रोडच्या शेवटी कडेला घेणे म्हनजे रोड ची रुंदी वाढून कॅरेज कपॅसिटी दिड लेननी वाढेल

सुचना क्र. २ :- ९३ AVENUU MALL पासुन ते बिग बाजार चौका समोरील बिआरटीचा बिम काढुन टाकणे

▪ सुचना क्र. ३ :- काळुबाई मंदीर ते वैदवाडी ट्रॅफिक पोलीस चौकी चौकापर्यंत सायकल ट्रॅक व फुटपाथ रोडच्या डेड एंडला घेणे जेनेकरून कॅरेज कपॅसिटी “एक लेन “ ने वाढेल

सुचना क्र. ४ :- रामटेकडी सिग्नल ते क्रोम चौकापर्यत पुण्याकडे जाताना चा बिआरटी बिम काढुन टाकणे

सुचना क्र. ५ :- किर्लोस्कर पुलावरील दोन्ही बाजु चे फुटपाथ डेडएन्डला घेणे म्हनजे किमान कॅरेज कपॅसिटी किमान “ एक लेन “ने वाढेल

सुचना क्र. ६ :- वैदवाडी सिग्नल ते मगरपट्टा चौक हडपसर कडे जातानाचा बिआरटी बिम काढून टाकणे, तसेच रामनाथ भेळच्या आसपास मधील रस्ता मोठा करणे सर्व्हिस रोड कमी करणे फुटपाथ डेडएन्डला घेणे जेनेकरून कॅरेज कपॅसिटी “एक लेन “ने वाढेल

सूचना क्र. ७ :- आर्यन सेंटर वैभव समोर कामधेनू इस्टेट तसेच रविदर्शन बिल्डीग समोरील सर्व्हिस रोड कमी करून तेथील फुटपाथ डेडएन्डला घेऊन रस्ता मोठा करणे

सूचना क्र. ८ :- हडपसर वेशी समोरील U TURN आर आर डागा या दुकाना समोर घेणे, म्हणजे वेशीतून उलट दिशेने हडपसर मार्गे ससाणेनगरला जाणाऱ्या नागरिकांमुळे बेबी कॅनाल समोरील ट्रॅफिक जाम होऊ नये.

सुचना क्र. ९ :- सोलापुर रोडवरून ससाणेनगरला जाताना मंत्री मार्केट समोरून RIGTH TURN दिल्यास जनसेवा बॅकेसमोरील वाहतूककोंडी होणारं नाही.

सुचना क्र. १० :- टेकवडे पेट्रोल पंपा समोर पादचारी मार्ग तयार करणे जेनेकरून GREENWOODS SCHOOLला जाणारी लहान मुले व पालक सुरक्षित रस्ता ओलांडतील

▪ सूचना क्र. ११ :- अमर सम्रुध्दी बेबी कॅनाल पुलावरील ट्रॅफिक सिग्नल व पादचारी मार्ग तयार करणे

Post Bottom Ad

#

Pages