😱 तळेगाव पोलीस महिला कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

😱 तळेगाव पोलीस महिला कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या💁‍♂ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने राहते घरी देहूरोड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

👉 सरस्वती के. वाघमारे असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचे नाव आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
वाघमारे या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. शनिवारी त्या आळंदी येथील बंदोबस्त संपवून घरी रात्री दोनच्या सुमारास आल्या. घरी आल्यानंतर त्या रूम मध्ये गेल्या. रविवारी सकाळी बराच वेळ झाल्या त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे दरवाजा ठोठावला. मात्र आतून काही प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी वाघमारे या गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आल्या. तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरगुती वादातून त्या निराश होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Post Bottom Ad

#

Pages