🚨 पुणे एसपी महाविद्यालयाजवळ २२ वर्षीय तरुणीनीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, November 25, 2019

🚨 पुणे एसपी महाविद्यालयाजवळ २२ वर्षीय तरुणीनीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक


💁‍♂ तोंड बांधलेल्या तरुणाने अश्लिल हावभाव करत एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसपी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली असून तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

👉 फिर्यादी यांची दखल घेत आरोपी निखील फाटे (वय २५, रा. दांडेकर पूल) याला अटक करत दत्तवाडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🚨 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार तरुणी ही एसपी कॉलेज जवळील मुलांच्या वसतीगृहा जवळून जात होती. त्यावेळी एक तरुण त्या ठिकाणी तोंड बांधून उभा होता. तरुणी जात असताना त्याने अश्लिल हावभाव करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages