😱शिक्रापूर-चाकण रोडवर वॉशिंग मशीन, टीव्ही घेऊन जाणारा अख्खा कंटेनरच ४ चोरटयांनी लुटून नेला - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, November 28, 2019

😱शिक्रापूर-चाकण रोडवर वॉशिंग मशीन, टीव्ही घेऊन जाणारा अख्खा कंटेनरच ४ चोरटयांनी लुटून नेला


💁‍♂वॉशिंग मशीन, टीव्ही घेऊन रांजणगाव एम.आय.डी.सीतून भिवंडीला जाणारा अख्खा कंटेनरच पिकअ‍ॅप टॅकमधून आलेल्या चार चोरट्यांनी लुटून नेला. सदर घटना हि शिक्रापूर-चाकण रोडवरील शेल पिंपळगावजवळील नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

👉या घटनेप्रकरणी कंटेनरचालक रामलिंग पंडित पाटील (वय ४७, रा. जगताप चौक, वानवडी) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रामलिंग पाटील हे रांजणगाव एम आय डी सीतील हायर कंपनीतून कंटेनरमधून ८७ वॉशिंग मशिन, ३१९ टीव्ही, असा ३३ लाख ६५ हजार रुपयांचा माल घेऊन भिवंडीला जात होते. ते रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर -चाकण रोडवरील शेलपिंपळगाव येथील पुलावर आले असताना एका पिकअ‍ॅप ट्रकमधून चौघे जण आले. त्यांच्या एक जण ड्रायव्हर बाजूने कंटेनरमध्ये चढला़ क्लिनर बाजूने दोघे जण आत आले. त्यांनी पाटील यांना हाताने मारहाण करुन शिटखाली कोंबून त्यांच्या अंगावर बसले. रस्सीने त्यांचे हातपाय बांधून डोळ्यावर पट्टी बांधली. तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर त्यांनी कंटेनर चाकण बाजूकडे कच्च्या रोडवर नेला. तेथे कंटेनरचे सील तोडून त्यातील सर्व माल पिकअ‍ॅप ट्रकमध्ये भरला. त्यानंतर कंटेनर इंदोरी टोलनाक्याचे पुढे सोडून देऊन ते निघून गेले. त्यानंतर रामलिंग पाटील यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली व पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत चौघांचा शोध घेत आहे.

Post Bottom Ad

#

Pages